पैठण : नवाब मलिक प्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने | पुढारी

पैठण : नवाब मलिक प्रकरणी महाविकास आघाडी आणि भाजप आमने-सामने

पैठण, पुढारी वृत्तसेवा

अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्याच्या निषेधार्थ पैठण येथे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारचा निषेध केला. तर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने दाऊद इब्राहिमची संपत्ती खरेदी प्रकरणी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची मागणी करून निदर्शने केली. यादरम्यान महाविकास आघाडीचे नेते आणि भारतीय जनता पार्टी आमने-सामने आले.

पैठण येथे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या वतीने नवाब मलिक यांच्यावरील कारवाईचा निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब निर्मळ, विशाल वाघचौरे, शहराध्यक्ष जितू परदेशी, दत्ता गोर्ड, अनिल घोडके, बजरंग लिंबोरे, कल्याण भुकेले, राजेंद्र उगले, महेंद्र साळवे, भाऊसाहेब पिसे, रावसाहेब अडसूळ, काँग्रेसचे निलेश पटेल, बाळू नजन, किरण जाधव हे सहभागी होते.

तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीच्या वतीने बसस्थानक चौकात नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने करण्यात आली. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष डॉ सुनील शिंदे, नगराध्यक्ष सुरज लोळगे, लक्ष्मण औटे, महेश जोशी,शेखर पाटील, विजय चाटुपळे, ज्ञानेश्वर दहिवाळ, सुनील रासने, विशाल पोहेकर, बंडू आंधळे, समीर शुक्ल, तिरुप परदेशी, सुरेश गायकवाड, विजय आचार्य, वैभव पोहेकर, सतीश आहेर, निखिल गुप्ता, विजय आचार्य, डॉ. राका हे सहभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या निषेधादरम्यान शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित असूनही सहभागी झाले नाहीत. या तीनही पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी मात्र अनुपस्थिती लावली.

हेही वाचलत का ?

Back to top button