औरंगाबाद : वीस वर्षीय युवकाची विष प्राशन करून आत्महत्या

वीस वर्षीय युवक
वीस वर्षीय युवक

पाचोड (जि. औरंगाबाद ),  पुढारी वृत्‍तासेवा : एका २० वर्षीय युवकाने स्वतःच्या शेतात जाऊन विषारी औषध प्राशन करुन आपले  जीवन संपविल्याची दुर्देवी घटना पैठण तालुक्यातील विहामांडवा येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजता उघडकीस आली. विशेष म्हणजे औषध सेवन केल्यानंतर  त्याने याची कल्पना चुलत भावाला कळविली होती.

पोलिसांनी याबाबत दिली माहिती

विहामांडवा येथील तुषार बंडू डुकरे (वय २०) असे मृत युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजता घरातून स्वतःच्या असलेल्या विहामांडवा शिवारातील शेतातील गट नंबर ५२ मध्ये उसाची लागवडीसाठी गेला होता. परंतु, तुषारने चुलत भाऊ प्रदीप डुकरेला नऊ वाजेच्या दरम्यान फोन करून विषारी औषध प्राशन केल्याचे सांगून त्याने फोन बंद करुन ठेवला. त्यानंतर घाबरलेल्या प्रदीपने गावातील व्यंकटेशला फोन करून तुषारने विषारी औषध घेतल्याचे सांगून घटनास्थळी लवकर जाण्याचे सांगितले. तोपर्यंत उशीर झाला होता कारण तुषार औषध प्राशन केलेल्या अवस्थेत तो जमिनीवर पडलेला दिसला.

पाचोड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयत तातडीने दाखल करण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी डाॅ.शिवाजी पवार यांनी त्यास तपासून मृत झाल्याचे घोषीत केले.  तसेच त्याची उत्तरीय तपासणी करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. मात्र या आत्महत्या  घटने मागील कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस त्या दृष्टीने तपास करीत आहे. दरम्यान या घटनेचे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त  करण्यात येत आहे. या घटनेची अकस्मात नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

हे ही वाचलं का  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news