CJP Abhijeet Dipke: सीजेपीच्या तिरंगा मोर्चाआधी दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा! पोलीस थेट अभिजीत दीपकेच्या घरी दाखल

‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) चे प्रमुख अभिजीत दीपके यांच्या दिल्लीतील तिरंगा मोर्चापूर्वी दिल्ली पोलीस आज दुपारी त्यांच्या झंडेवालान येथील निवासस्थानी पोहोचले आहेत.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeFile Photo
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (सीजेपी) ने आज दिल्लीत तिरंगा मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. काही तासांपूर्वीच सीजेपी प्रमुख अभिजीत दीपकेंनी आपल्याला पोलिसांकडून ताब्यात घेतले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली होती. त्यानंतर दुपारीच दीपके यांच्या झंडेवालान येथील निवासस्थानी दिल्ली पोलीस पोहोचले आहेत.

दिल्ली पोलिसांनी अभिजीत दीपके यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांचे एक पथक दीपके यांना नोटीस देण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, कनॉट प्लेसमध्ये कलम १६३ लागू आहे आणि तिरंगा यात्रेसाठी एनडीएमसीकडून कोणतीही परवानगी नाही; तरीही जर त्यांनी कनॉट प्लेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, तर ते कलम १६३ चे उल्लंघन ठरेल.

CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet Dipke: ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं...; सीजेपीला स्वकीयांचाच सर्वात मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

मतदारांच्या नावनोंदणीतील कथित अनियमिततेविरोधात सीजेपीचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर सीजेपी आणि दिल्ली पोलीस यांच्यातील हा नवीन संघर्ष समोर आला आहे. दिल्ली पोलिसांचे सुमारे डझनभर अधिकारी, ज्यामध्ये महिला पोलिसांचीही मोठी संख्या आहे, दिपके यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

दिपके यांना ताब्यात घेण्यात आले आहे की त्यांना घरातच नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, याबद्दल दिल्ली पोलिसांकडून कोणतेही अधिकृत माहिती आलेली नाही. गुरुवारी दिल्लीत पोहोचलेल्या दिपके यांनी रात्री उशिरा घेतलेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांना सांगितले होते की, काही वाहने ज्यांना नंबर प्लेट्स नाहीत त्यांचा पाठलाग करत आहेत आणि 'इंटेलिजन्स ब्युरो' (IB) चे कर्मचारी त्यांच्या निवासस्थानावर लक्ष ठेवून आहेत.

CJP Abhijeet Dipke
CJP Tiranga March : 'सीजेपी'च्‍या ‘तिरंगा मार्च’ला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार; दिल्ली पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news