

पुढारी ऑनलाईन डेस्क : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने (एमपीसीसी) रविवारी (दि.10) रात्री आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षाची शिस्तभंग करणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी पक्षामधून एकूण 22 बंडखोरांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने काढले आहे. यामध्ये पक्षाच्या सोबत शिस्तभंग केल्यामुळे ही तीव्र कारवाई केली, असे म्हंटले आहे.
सुरुवातीला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने 21 इतर बंडखोरांना निलंबित केले होते. यानंतर त्यांनी आणखी 7 जणांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला. त्यामुळे आता निलंबित केलेल्यांची संख्या 28 वर पोहचली आहे. 22 मतदारसंघात निलंबनाची संख्या 28 झाली आहे. हे निलंबित उमेदवार महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. यापूर्वी, काँग्रेस नेते रमेश चेन्निथला म्हणाले होते की अधिकृत 'मविआ' उमेदवारांविरुद्ध लढणाऱ्या सर्व पक्षीय बंडखोरांना सहा वर्षांच्या निलंबनाला सामोरे जावे लागेल.
आनंदराव गेडाम, शिलू चिमुरकर, सोनल कोवे, भरत येरमे, अभिलाषा गावतुरे, प्रेमसागर गणवीर, अजय लांजेवार, विलास पाटील, आस्मा जावद चिखलेकर, हंसकुमार पांडे, कमल व्यवहारे, मोहनराव दांडेकर, मंगलराव दांडेकर, मोहनराव दांडेकर यांचा समावेश आहे. मनोज शिंदे, सुरेश पाटीलखेडे, विजय खडसे, शाबीर खान, अविनाश लाड, याज्ञवल्य जिचकार, राजू झोडे, राजेंद्र मुका, शामकांत सनेर, राजेंद्र ठाकूर, आबा बागुल, मनीष आनंद, सुरेश कुमार जेथलिया, कल्याण बोराडे आणि चंद्रपॉल चौकसे यां सर्वांना पक्षातून 6 वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.