शेतकर्‍यास बेदम मारहाण; भाजी मार्केटमधील प्रकार

शेतकर्‍यास बेदम मारहाण; भाजी मार्केटमधील प्रकार

Published on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील भाजी मार्केटमध्ये गाडी सरकवल्याच्या कारणातून एका शेतकर्‍यास बेदम मारहाण झाल्याची घटना गुरुवारी पहाटे 6 वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी दोघांवर कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर तालुक्यातील बुरूडगाव शिवारात व्हीआरडी शेजारी राहणारे शेतकरी ईश्वर लक्ष्मण जाधव (वय 34) हे भाजीपाला विकण्यासाठी नेहमी मार्केट यार्डमध्ये येत असतात. गुरुवारी नेहमीप्रमाणे ते सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास शेतातील भाजीपाला विक्रीसाठी भाजीपाला मार्केट येथे आले होते.

तेथे गेल्यानंतर ते भाजीपाला विक्रीसाठी त्यांची गाडी लावण्यासाठी तेथील अगोदर असलेली गाडी थोडी सरकवून त्यांची गाडी लावत होते. त्यावेळी तेथील हमाल किरण पोटे व त्याच्यासोबत एकजण असे दोघांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यावेळी ते म्हणाले 'तू आमची गाडी का सरकावली, त्यावर मी त्यांना बोललो की, मी तुमची गाडी फक्त सरळ केलेली आहे.

बाजूला नाही काढली, मला माझी गाडी लावायची आहे. त्यामुळे मी तुमची गाडी थोडी सरकवली आहे, असे सांगितले असता या गोष्टीचा राग आल्याने किरण पोटे याने हातातील वस्तूने माझ्या उजव्या डोळ्याचे बाजूला तोंडावर मारले. त्याच्यासोबतच्या व्यक्तीने मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली, असे शेतकरी जाधव यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक राहुल गवळी करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news