शनिशिंगणापूर सेवा संस्थेची निवडणूक झाली बिनविरोध

शनिशिंगणापूर सेवा संस्थेची निवडणूक झाली बिनविरोध

नेवासा : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील महत्वाची शनिशिंगणापूर सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये शनैश्वर ग्रामविकास मंडळाचे एकहाती वर्चस्व सिद्ध झाले. ही निवडणूक मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच बापुसाहेब शेटे, बाळासाहेब बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली झाली.

संस्थेच्या 11 जागांसाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या विचारधारेप्रमाणे सेवा संस्था शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी असून, तिला राजकीय अड्डा होऊ न देण्याचे आवाहन शेटे व बोरूडे यांनी केले. यानंतर विचारविनिमय करून काही उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली.

यानंतर रावसाहेब शिवाजी बानकर, गोपीनाथ विठ्ठल देठे, सुरेश मच्छिंद्र शेटे, रंगनाथ किसन शेटे, संतोष राजाराम बोरूडे, नितीन वसंत कुर्‍हाट, रायभान हनुमंत दरंदले, नवनाथ भास्कर शेटे, उज्ज्वला भाऊसाहेब शेटे, सुशीला रघुनाथ शेटे, तुकाराम विश्वनाथ बानकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी एस.व्ही. ठोंबरे यांनी जाहीर केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news