शनिचौथर्‍यावर आता तेल अभिषेक करण्याची संधी

शनिचौथर्‍यावर आता तेल अभिषेक करण्याची संधी
Published on
Updated on

सोनई : पुढारी वृत्तसेवा : शनीशिंगणापूर (ता. नेवासा) येथे राज्यासह, देशभरातून व परदेशातूनही भाविक श्री. शनैश्वराच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते. वर्षभर भाविकांचा मोठा ओघ शनिशिंगणापूरला भाविकांचा असतो.गेल्या अनेक दिवसांपासून शनिभाविकांची चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करता यावा, ही मागणी होती.

यानुसार श्री शनैश्वर देवस्थान ट्रस्टने विश्वस्त मंडळाच्या बैठकीत शनी चौथर्‍यावर जाऊन तेल अभिषेक करण्यासाठी शनी दि 18 जुन 2022 पासून परवानगी दिली आहे.ज्या भाविकांना शनी देवास तेल अभिषेक करावयाचा असेल अशा भाविकांना श्री. शनैश्वर देवस्थान ट्रस्टची 500 रु ची देणगी पावती घेऊन शनी चौथर्‍यावर अभिषेक करता येईल.

सदरचे तेल अभिषेक पावतीकरता भाविकांनी देवस्थानची तेलविक्री काउंटर, देणगी काउंटर तसेच जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी केले आहे.

शनिभक्तांच्या मागणीनुसार निर्णय
राज्यासह, देशभरातील अनेक देवस्थानां मध्ये भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन पेड पासेस दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत, याच धर्तीवर शनिभक्तांच्या मागणीचा विचार करून शनिशिंगणापूर देवस्थान ट्रस्टने निर्णय घेतला आहे. त्याचे शनी भक्तामधून स्वागत होत आह

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news