राहुरी : सिनेस्टाईल पाठलाग करुन बोलोरोसह चोरटा ताब्यात

राहुरी : सिनेस्टाईल पाठलाग करुन बोलोरोसह चोरटा ताब्यात
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : नगर- मनमाड महामार्गावरील फ्रिजचे दुकान फोडून दोन डीप फ्रिज चोरून नेताना पोलिस पथकाने सुमारे 25 किलोमीटरपर्यंत चोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करून, ऐवजासह एकास ताब्यात घेतले. तर दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. शनिवारी पहाटेच्या दरम्यान हा थरार सुरु होता. हर्षल सतीश दुसाणे यांचे राहुरी शहर हद्दीत नगर-मनमाड राज्य महामार्गालगत खंडोबा मंदिराशेजारी शीतल नावाचे फ्रिजचे दुकान आहे. (दि.20) ऑगस्ट रोजी पहाटे अडीचच्या सुमारास तीन चोरट्यांनी हर्षल दुसाणे यांच्या दुकानाचे शटर उचकटून 65 हजार रूपये किंमतीचे दोन डीप फ्रिज बोलेरो पिकअप गाडीत भरले.

सुदैवाने याच दरम्यान पोलिस पथक गस्त घालत होते. पोलिस गाडी पाहून चोरटे गाडीस पसार होऊ लागले. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, हवालदार सचिन ताजने, चालक लक्ष्मण बोडखे यांच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून, जीवाची पर्वा न करता सुमारे 25 किलोमीटर म्हणजे सोनईपर्यंत पोहचले. सोनईत चोरांची गाडी पलटी झाली अन् पोलिसांनी त्यांच्यावर ताबडतोब झडप घातली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news