

पारनेर : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील निघोज येथील वरखेड वस्तीवर बेकायदा गॅस रिफिल करणार्या अड्ड्यावर बुधवारी सायंकाळी सहा वाजता नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छापा टाकत 39 गॅस टाक्या जप्त केल्या. या प्रकरणी अरुण पोपट वरखडे (वय 36, रा. वरखडेवस्ती, निघोज, ता. पारनेर) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, यासंबंधी फिर्याद पोलिसॅ मयूर दिपक गायकवाड यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिली आहे. एलसीबीने या कारवाईत 80 हजार 820 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या फिर्यादीत म्हटले आहे की, 1 जून रोजी सहायक पालिेस ेनिरीक्षक दिनकर मुंढे, सहायक फोजदार भाऊसाहेब गोविंद काळे, हवालदार विजयकुमार बाळासाहेब वेठेकर, दत्तात्रय हिंगडे, पोलिस नाईक राहुल सोळुंके, पोलिस सागर ससाणे (सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा) यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या आदेशान्वये सरकारी वाहनातून (क्रमांक एमएच 16 एन 590) पारनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीतअसतांना सपोनि दिनकर मुंढे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, अरुण वरखडे (राहणार. वरखडे वस्ती) येथे निघोज ते वडनेर रस्त्याच्या कडेला घराच्या आडोश्याला गॅस सारख्या ज्वलनशील पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता धोकादायक पद्धतीने एका गॅस टाकीमधून दुसर्या घरगुती गॅस टाकीमध्ये गॅस रिफीलिंग करुन गॅसची चोरी करीत आहे.
खात्रीशीर माहिती मिळताच सपोनि दिनकर मुंढे, यांनी दोन पंचाना निघोज येथे बोलावून त्यांना छापा टाकण्यासाठी पंच म्हणून सोबत येण्यास कळविले. ते येण्यास तयार झाले, तसेच कारवाई करीता लागणारे साहित्य (लॅपटॉप, प्रिंटर, लाख, पेज, सिल) घेतले. बाबत कळवीले असता त्यांनी सहमती दर्शवली.
त्यानंतर आम्ही वरखडे वस्तीवर गेलो असता, घराच्या आडोशाला एका घरगुती गॅस टाकीमधून दुस-या घरगुती गॅस टाकीमध्ये गॅस भरत असताना आढळून आला. सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. अरुण पोपट वरखडे (वय 36 रा. वरखडेवस्ती, निघोज ता. पारनेर) असे त्याने स्वतःतचे नाव सांगितले. माझ्याकडे गॅस भरण्याचा व विक्री करण्याचा कोणताही परवाना नसल्याचे त्याने सांगितले.
घटनास्थळी गॅस टाक्या, गॅस रिफिल करण्याची इलेक्ट्रिक मोटार व इजेक्ट्रिक वजन काटा आता मुद्देमाल मिळून आला. मुंढे यांनी जागीच जप्ती पंचनामा लॅपटॉपवर करुन त् पारनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलो. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्यासह पोलिस कर्मचारी करत आहेत.