पिसाळलेल्या रानडुकराने घेतला अनेकांना चावा

पिसाळलेल्या रानडुकराने घेतला अनेकांना चावा
Published on
Updated on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : पिसाळलेल्या रानडुकराने नगर तालुक्यातील सारोळा कासार, तसेच अस्तगाव (ता. पारनेर) शिवारात अनेकांना चावा घेतले. या हल्ल्यात एक महिलेसह बालक जखमी झाले. सारोळा कासार येथील इंदिरानगर वसाहतीत गुरुवारी (दि. 1) रात्री आठ वाजता पिसाळलेल्या रानडुकराने धुमाकूळ सुरू केला. जनाबाई जानकू हातेकर (वय 65) यांच्यावर हल्ला करत शिवा कृष्णा हातेकर या चिमुकल्याच्या खांद्याला चावा घेतला. नंतर हे रानडुक्कर सैरावैरा धावत सुटले.

त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. काही तरुणांनी हातात लाठ्या-काठ्या घेऊन त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तरुणांना त्याने धडका देऊन जखमी केले. त्यानंतर रात्रीच्या अंधारात धामणेवस्तीवरील नागरिकांनी आरडाओरडा करीत दगड मारून त्यास पिटाळून लावले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 2) सकाळी अस्तगाव शिवारात छबू भिवा काळे यांच्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक रामचंद्र अडागळे, वनमजूर सुभाष हंडोरे यांनी शुक्रवारी (दि. 2) सकाळी इंदिरानगर येथे येऊन जखमी जनाबाई हातेकर व बालकाची भेट घेऊन विचारपूस केली, तसेच घटनेचा पंचनामा केला. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संजय राहिंज, वामन कोळेकर, संजय नेटके आदी उपस्थित होते. दरम्यान, परिसरात रानडुकरांनी पिकांची नासाडी चालविल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news