पाथर्डी :चोरीस गेलेला मोबाईल आरोपीकडून हस्तगत

पाथर्डी :चोरीस गेलेला मोबाईल आरोपीकडून हस्तगत

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : सुमारे तीन वर्षांपूर्वी मोबाईल चोरी करणारा आरोपी मोबाईलसह पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांना मिळालेल्या माहितीनुसार पाथर्डी येथे सन 2019 मध्ये मोबाईल चोरणारा आरोपी शेवगाव रस्त्यावरआला आहे त्यावरून तांत्रिक पद्धतीने तपास करुन सदर संशयित आरोपी नारायण जबाजी बेंद्रे (वय 35, रा.भातकुडगाव, ता. शेवगाव) याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडे तपास करता आठ हजारांचा मोबाईल आढळून आला. याबाबत संशयिताने कबुली दिल्याने त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस नाईक राम सोनवणे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल कर्डिले यांनी केली. दरम्यान, फिर्यादी जालिंदर मंजेराव उर्किडे (रा. ढोरजळगाव, ता. शेवगाव) यांचा पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील आठवडा बाजारातून आठ हजार रुपय किंमतीचा मोबाईल चोरी केला होता. या घटनेबाबत पाथर्डी पोलिस ठाण्यात 11 डिसेंबर 2019 रोजी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news