पंकजा मुंडे समर्थकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पंकजा मुंडे समर्थकाचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पाथर्डी ; पुढारी वृत्तसेवा : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी न दिल्याने निराश झालेल्या त्यांच्या समर्थकाने विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मुकुंद गर्जे असे त्याचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भाजपकडून पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलले जात आहे. त्यांचे राजकीय करिअर संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी पोस्ट गर्जे यांनी गुरुवारी समाजमाध्यमावर केली. दुपारी तीनच्या सुमारास ते एका कार्यालयात होते. त्यावेळी त्यांनी सोबत आणलेले कीटकनाशक घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सोबतच्या मित्रांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गर्जे यांना रोखले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

logo
Pudhari News
pudhari.news