नगर : सावेडीत मायलेकाला मारहाण

File Photo
File Photo
Published on
Updated on

नगर, पुढारी वृत्तसेवा : सावेडी उपनगरात आई व मुलाला कचरा टाकण्याच्या कारणावरून मारहाण झाली. याबाबत तोफखाना पोलिस ठाण्यात शेजारी राहणार्‍या सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री एकनाथ जाधव (रा.सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

संतोष शंकर जाधव, सचिन संतोष जाधव, शंकर राजू जाधव, सीमा सचिन जाधव, ज्योती संतोष जाधव, हौसाबाई शंकर जाधव (सर्व रा. सावेडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्याद व त्यांच्या शेजारी राहणार्‍या जाधव कुटूंबात कचरा टाकण्याच्या कारणावरून मंगळवारी वाद झाले होते.

दरम्यान, फिर्यादी जयश्री जाधव या बुधवारी कामावर गेल्या असता त्यांचा मुलगा महेश याला सहा जणांनी लाडकी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी कामावरून घरी आल्यानंतर त्यांना देखील मारहाण व शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलिस करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news