नगर शहरामध्ये नालेसफाई जोरात

नगर शहरामध्ये नालेसफाई जोरात
Published on
Updated on

नगर:  पुढारी वृत्तसेवा

नगर शहरात पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई सुरू असून, गेल्या आठ दिवसांपासून सावेडी उपनगर, भिंगारनाला, सिव्हिल हडको पसिरात नालेसफाई जोरदार सुरू आहे. नगर शहरात पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई सुरू आहे.

नालेसफाईची टेंडर प्रक्रिया तांत्रिक मुद्दयात अडकली होती. मात्र, त्यातील तांत्रिक मुद्दे निकाली निघाल्यानंतर नालेसफाईला सुरुवात करण्यात आली. सध्या तीन पोकलेन मशिनद्वारे शहरात नालेसफाई सुरू आहे. औरंगाबाद रस्त्यावरील सनी पॅलेस येथून नालेसफाईला सुरुवात झाली आहे.

सनी सॅलेस, निर्मलनगर, जुना पिंपळगाव रस्ता, पवनगर परिसरापर्यंत नालेसफाई करण्यात आली आहे. नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाजवळून वाहणार्‍या नाल्याची नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, मिस्कीन मळा, सिव्हिल हडकोपर्यंत नालेसफाई करण्यात आली आहे. भिंगारनाल्यातील सफाई कानडे मळ्यापर्यंत आली आहे.

येत्या चार दिवसांत वरील सर्व नाल्यातील सफाई पूर्ण होणार आहे. दरम्यान, सीना नदीतील घनकचरा व जलपर्णी हटविण्यासाठी शुक्रवारपासून आणखी एक पोकलेन मशिन येणार आहे. त्यानंतर सीना नदीतील सफाई सुरू होईल, असे शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news