नगर : लिंकरोड येथे हातभट्टी अड्ड्यावर छापा

नगर : लिंकरोड येथे हातभट्टी अड्ड्यावर छापा

नगर : पुढारी वृत्तसेवा : लिंक रोड परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोतवाली पोलिसांच्या मदतीने कारवाई केली आहे. दहा हजार रूपयांचे रसायन, तीन हजार 500 रूपयांची दारू असा 13 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कोतवाली पोलिस ठाण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. संदीप कचरू पवार यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार आरोपी गोकुळ भास्कर पवार (42, रा. लिंकरोड, पवार मळा) याच्याविरूद्ध गुन्हादाखल करण्यात आला आहे. घराच्या आडोश्याला गावठी दारू तयार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पोहेकॉ संदिप पवार, संदिप घोडके, योगेश सातपुते, लक्ष्मण खोकले, संभाजी कोतकर आणि कोतवाली पोलिस ठाण्याचे गणेश धोत्रे व सागर पालवे आदींच्या पथकाने करवाई केली.

logo
Pudhari News
pudhari.news