नगर : राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर खड्डेच खड्डे

नगर : राहुरी-शिंगणापूर रस्त्यावर खड्डेच खड्डे
Published on
Updated on

उंबरे : पुढारी वृत्तसेवा : राहुरी – शनि शिंगणापूर या 25 किलो मीटर रस्त्यावर लहान-मोठे हजारो खड्डे पडले आहेत. परिणामी या रस्त्यावर दररोज एक तरी अपघात होत आहे. खराब रस्त्यामुळे काही प्रवाशांचे नाहक बळी गेले आहेत. दरम्यान, सिमेंट काँक्रेट रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची ओरड ऐकू येत आहे.

या रस्त्यावर अनेक ठिकाणी तब्बल एक ते दीड फुटापर्यंत खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिरा पडल्या आहेत. पुलांवरील लोखंडी जाळी मोकळी झाली आहे. उंबरे येथील एका तरुणाचा रस्त्यावर पडलेल्या चिरेमध्ये गाडी अडकून अपघातात मृत्यू झाला. रस्त्यावर पडलेल्या चिरा व खड्ड्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात.

या रस्त्याच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. राहुरी ते शनि शिंगणापूर हा सिमेंट काँक्रेट रस्ता कित्येक कोटी रुपये खर्चाचे काम सुरू होते, परंतु काम सुरू असतानाच रस्ता ठिक -ठिकाणी उखडल्याने रस्त्याचे काम कोणत्या पद्धतीने केले, हे लक्षात येते. या कामात सिमेंटचे प्रमाण कमी असल्याने ठिक -ठिकाणी रस्ता उखडला आहे. रस्त्याच्या पायाच्या कामामध्ये मुरूम भरणे गरजेचे असताना माती भरल्याने रस्ता अनेक ठिकाणी खचला. परिणामी रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसते. रस्ता कामासाठी कडेच्या शकडो वृक्षांची कत्तली करण्यात आली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news