नगर : मुगाला 7 हजार 751 रुपये भाव

नगर : मुगाला 7 हजार 751 रुपये भाव
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भुसार विभागात मुगाची आवक सुरु झाली आहे. या मुगाला जास्तीत जास्त प्रतिक्विंटल 7 हजार 751 रुपये दर मिळाला आहे. यंदाच्या खरीप हंगामातील मुगाची काढणी सुरु झाली. त्यामुळे विक्रीसाठी बाजार समितीच्या यार्डाच्या भासार विभागात आवक सुरु झाली.

मंगळवारी 550 क्विंटल मुगाची आवक झाली होती. त्यामुळे मुगाला जास्तीत जास्त 7 हजार 751 रुपये इतका दर मिळाला आहे. रविवार वगळता इतर दिवशी दररोज सकाळी 11 वाजता भुसार बाजाराचा लिलाव सुरु होत आहे. त्यामुळे मुग उत्पादक शेतकर्‍यांनी आपला माल सुकवून व स्वच्छ करुन आणावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक किशन रत्नाळे यांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news