नगर : भरधाव डंपरखाली चिरडून 19 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू

नगर : भरधाव डंपरखाली चिरडून 19 मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू
Published on
Updated on

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : नगर-औरंगाबाद रस्त्यावर पोखर्डी गावाजवळ भरधाव जाणार्‍या खडीच्या डंपरखाली चिरडून 19 मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर 25 मेंढ्या जायबंदी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि.7) दुपारी 4 च्या सुमारास घडली. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मेंढपाळ आपल्या मेंढ्यांचे कळप घेऊन नाशिकला गेले होते.

तेथून परत येताना ते मनमाड-औरंगाबाद रस्त्याने नगरमार्गे पुण्याकडे चालले होते. चालकाचा डंपरवरील (एमएच 16 एवाय 6599) ताबा सुटल्याने डंपर रस्ता दुभाजकावर चढला. त्याखाली बाजूने चाललेल्या मेंढ्या चिरडल्या. त्यामुळे रस्त्यावर मेंढ्यांच्या मांसाचा खच पडला होता. या अपघातामुळे मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेमुळे नगर-औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. स्थानिक रहिवासी जगन्नाथ निमसे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी वहातुक कोंडी सुरळीत करण्यासाठी पोलीसांना मदत केली. सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news