बोटा, पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकुर जवळील बिरेवाडी येथील शेतकरी लालू नारायण ढेंबरे यांची एक दुभती गाय व तीन गाभण शेळ्यांचा गवतातून विषबाधा झाल्याने तडफडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवार रात्री 11 वाजेच्या सुमारास घडली.
साकुर जवळील बिरेवाडी येथील शेंडगे वस्तीवरील दुधाणे मळ्यात लालू नारायण ढेंबरे या शेतकर्याच्या 10 शेळ्या व 2 गाया आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन जोंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.जनावरांची तपासणी केल्यानंतर गवतातून विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले. ढेंबरे यांचे मोठे नुकसान झाले.
चिबुकाटा गवत खाल्ल्याने 3 शेळ्या व 1 गाय दगावली. चिबुकाटा गवतातून हायड्रोजन सायनाईमुळे विषबाधा झाल्याची शक्यता आहे, परंतु या शेतकर्याला भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
– डॉ. नितीन जोंधळे, पशुवैद्यकीय अधिकारी