नगर : पिचड समर्थक वाकचौरे राष्ट्रवादीत; कमळ सोडून आज मुंबईत बांधणार हातात घड्याळ

नगर : पिचड समर्थक वाकचौरे राष्ट्रवादीत; कमळ सोडून आज मुंबईत बांधणार हातात घड्याळ

अकोले : पुढारी वृत्तसेवा: माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आ. वैभवराव पिचड यांचे विश्वासू सहकारी समजले जाणारे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे हे मुंबई येथे आज (मंगळवारी) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याची खात्रीलायक माहिती विश्वनिय सुत्रांकडून दरम्यान, त्यांच्या या पक्षांतराने कमळ सोडून ते हाती घड्याळ बांधणार असल्याची चर्चा झडत आहे.

मंगळवारी सकाळी 9 वाजता मुंबई येथील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वाकचौरे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यावेळी आ. डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सिताराम पा. गायकर, जि.प.माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे या पक्ष प्रवेश सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.

वाक्चौरे यांच्या पक्षांतरामुळे अकोले तालुक्यातील आणखी एक बडा नेता भाजप सोडून राष्ट्रवादी पक्षात दाखल होणार असल्याचे खात्रीलायक माहिती सूत्रांकडून समजली आहे. अकोले नगरपंचायत निवडणुकीनंतर पदाधिकारी नेमणुकीत जि.प. बांधकाम समितीचे माजी सभापती वाक्चौरे यांना विश्वासात न घेतल्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून पिचड पिता -पुत्रांवर नाराज होते,

मात्र वाकचौरे यांनी सोमवारी अगस्ती साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनलमधून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली. अशात मंगळवारी वाकचौरेंसह भाजपचे काही नेते, पुढारी, कार्यकर्ते अधिकृतरित्या राष्ट्रवादीत पुन्हा घरवापसी करणार असल्याने भाजपाला अकोले तालुक्यात मोठा धक्का बसणार आहे.अकोले नगरपंचायत निवडणुकीमध्ये पडद्याआडचे 'किंग मेकर'ची भूमिका वाकचौरे यांनी बजावली होती.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news