नगर : गावठी कट्टे प्रकरणातील आरोपींसह पोलिस मध्य प्रदेशाकडे रवाना | पुढारी

नगर : गावठी कट्टे प्रकरणातील आरोपींसह पोलिस मध्य प्रदेशाकडे रवाना

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा: श्रीरामपुरात गेल्या वर्षभरात तब्बल 2 डझन गावठी कट्ट्यांसह अर्ध्या शेकडा जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आल्याने श्रीरामपुरात गावठी कट्ट्यांना ‘अच्छे दिन!’ असे उपहासाने म्हटले जात आहे. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी 8 गावठी कट्टे व 10 जिवंत काडतुसांसह जेरबंद केलेल्या तिघांना सोबत घेवून, पोलिस पथक मध्य प्रदेशाकडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

स्वच्छ, सुंदर व शांतता प्रिय असलेल्या श्रीरामपूर शहरात चक्क डझनांवर घातक गावठी कट्टे सापडल्याने संताप व्यक्त होत आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळालेल्या गुप्त खबरीनुसार शहरातील हॉटेल राधिकाच्या पार्किंग परिसरात सापळा रचून तिघांना तीन दिवसांपूर्वी गावठी कट्ट्यांसह जेरबंद करण्यात आले.

दरम्यान, नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक बी. जे. शेखर यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली या तपासाची चक्रे गतीने फिरत आहेत. श्रीरामपुरातील बाजार तळ परिसरातील रहिवाशी राहुल कलाणी, अक्षय कलाणी व आकाश सिंग यांना घेवून पोलिस पथक मध्य प्रदेशकडे रवाना झाले आहे. या तिघांसह अन्य आरोपी गळाला लागणार आहेत.

हेही वाचा

सोलापूर : रिपब्लिकन पक्ष लढणार नऊ प्रभागांत

सांगली : कुपवाडमध्ये दोन कुटुंबांत हाणामारी

सातारा : गोडोली तळ्यासाठी 4 कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी : खा. उदयनराजे

Back to top button