दहिगावने : येथील घेवरी दोन नंबर लिफ्ट या रस्त्याची पावसाने झालेली दुरवस्था.(छाया : बाळासाहेब पानकर)
दहिगावने : येथील घेवरी दोन नंबर लिफ्ट या रस्त्याची पावसाने झालेली दुरवस्था.(छाया : बाळासाहेब पानकर)

नगर : पावसाने लावली घेवरीतील रस्त्याची वाट

Published on

दहिगावने : पुढारी वृत्तसेवा : शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील घेवरी दोन नंबर लिफ्ट या रस्त्याची पावसाने वाट लागली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडून रस्ता चिखलमय झाला आहे. रस्त्याची पूर्णत: चाळण झाल्याने चालणेही अवघड झाले आहे. रस्ता दुरुस्तीच्या मागणीवर ग्रामपंचायतीकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

लिफ्ट रस्त्यावरील 30 ते 35 लोकवस्ती असलेल्या ग्रामस्थांसाठी हा रस्ता खड्डे व चिखलमय झाल्याने जीवघेणा ठरत आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यालगत असलेल्या शेतातील पावसाचे पाणी व मातीही रस्त्यावर येत आहे. चिखलामुळे प्रवास करणे तर सोडाच, पायी चालणेही अवघड झाले आहे. नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांना सोसावा लागत आहे.

या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी मनोज काळे, बाळासाहेब काळे, विनायक घुले, सतीश घुले, नंदू घुले, याकूब शेख, विलास जगताप, रामोजी सकुंडे, मच्छिंद्र जगताप, छत्रपती कमानदार यांच्यासह विद्यार्थी, पालकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news