crime
crime

नगर : दारू पिऊन जावयाने केली सासू, सासर्‍यास मारहाण

Published on

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : बायकोला नांदायला पाठवत नाही. या कारणावरून दारू पिऊन आलेल्या जावयाने वयोवृद्ध सासू, सासर्‍याला दगडाने मारहाण करून जखमी केले. राहुरी तालुक्यातील चिंचाळे येथे (दि. 21) ऑगस्ट रोजी हा संतप्त प्रकार घडला.

रात्रीच्या दरम्यान या घटनेतील अण्णासाहेब गजानन बर्डे (वय 60 वर्षे, रा. केकताई वस्ती, चिंचाळे) हे स्वतःच्या घरात झोपले होते. मध्यरात्री साडेबारा वाजेदरम्यान त्यांच्या घरी जावई आबा मोरे व त्याचा मावस भाऊ बाल्या राजपूत दारू पिऊन आले. ते अण्णासाहेब बर्डे यांना म्हणाले, 'तुम्ही माझी पत्नी सविता हिला नांदायला का पाठवत नाही', असे म्हणत भाऊसाहेब बर्डे व त्यांची पत्नी विमल बर्डे या दोघांना दगडाने मारहाण करून जखमी केले. 'माझी बायको सविताला तुम्ही लवकर नांदायला पाठवा, नाहीतर तुम्हाला जिवंत सोडणार नाही', अशी धमकी दिली.

अण्णासाहेब गजानन बर्डे यांच्या फिर्यादीवरून आबा भाऊसाहेब मोरे (रा. गुहा, ता. राहुरी) व बाल्या राजपूत (रा. टाकळीभान, ता. श्रीरामपूर) या दोघांविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रामनाथ सानप करीत आहे. जावयाचा हा प्रताप चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news