नगर : तारकपूर बसस्थानकातून महिलेचे दागिने लंपास

नगर : तारकपूर बसस्थानकातून महिलेचे दागिने लंपास

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर शहरातील तारकपूर बसस्थानकातून महिलेच्या बॅगमधील 4 तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र व 700 रुपये रोख रक्कम ठेवलेली पर्स अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. ही घटना रविवारी (दि.10) सायंकाळी 4.15 वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत रुपाली रामेश्वर औटे (रा. श्रीराम सोसायटी, चंदननगर, पुणे) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रूपाटी औटी नगरमध्ये माहेरी आल्या होत्या. आई-वडिलांना भेटून त्या रविवारी दुपारी 4.15 च्या सुमारास पुण्याला जाण्यासाठी तारकपूर बसस्थानकात गेल्या होत्या. तेथे बसची वाट पाहत बसलेल्या होत्या. बसस्थानक नियंत्रण कक्षातून पुण्याला जाणारी गाडी फलाट क्रमांक 10 च्याविरुद्ध दिशेला लागणार असल्याची उद्घोषणा करण्यात आली. त्यावेळी त्या गडबडीने हातातील बॅग व पिशव्या घेऊन निघाल्या होत्या.

त्या गडबडीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगमधील सोन्याचे दागिने ठेवलेली पर्स व रोख रक्कम चोरून नेली. औटे समोरच्या फलाटवर गेल्यानंतर त्यांना बॅगमध्ये पर्स आढळून आली नाही. त्यामुळे पर्स चोरीला गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news