नगर : टेम्पोची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू

नगर : टेम्पोची धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू
Published on
Updated on

सुपा, पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर सुपा गावाजवळ पवारवाडी वस्तीवरून सुपा गावाकडे दुचाकीवरून जात असताना, टेम्पोच्या धडकेत हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब पवार हे गंभीर जखमी झाले. खासगी दवाखान्यात उपचार सुरू असताना तीन तासांनी त्यांचा मृत्यू झाला.

सुप्याजवळ पवार वस्तीवरून नेहमीप्रमाणे हॉटेल व्यवसायिक बाळासाहेब पवार हे त्यांच्या दुचाकीवरून सुपा गावाकडे येत असताना पेट्रोल पंपावरून डिझेल भरून निघालेल्या टेम्पोने रस्ता दुभाजक ओलांडताना पवार यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात ते खाली पडून बेशुद्ध झाले. आजूबाजूच्या लोकांनी त्यांना तत्काळ सुप्यातील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. परंतु, जखमा गंभीर स्वरूपाच्या असल्याने नगर येथे खाजगी उपचारासाठी नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना त्यांचा दुपारी तीन वाजता दवाखान्यातच मृत्यू झाला. दीड वर्षांपूर्वी बाळासाहेब पवार यांचे सख्खे बंधू संदीप पवार यांचे अपघाती निधन झाले होते. त्यामुळे सुपा गावावर शोककळा पसरली आहे.

आठवड्यात सहावा बळी

नगर-पुणे महामार्गावर सुपा ते बेलवंडी फाट्यापर्यंत झालेल्या अपघातात एका आठवड्यात हा सहावा बळी गेला आहे. महामार्गावरून ये-जा करताना दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाने यावर योग्या त्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news