नगर : चिंचपूर पांगुळ परिसरात पाऊस

नगर : चिंचपूर पांगुळ परिसरात पाऊस

चिंचपुर पांगुळ : पाथर्डी तालुक्यातील पूर्वभागातील वडगाव परिसरात पाच वाजलेपासून रात्री आठ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. वडगाव, जोगेवाडी, खलाटवाडी पिपळगाव, जाटवड, चिंचपुर पांगुळ, ढाकनवाडी, मानेवाडी येथील ओढे, नाले खळखळून वाहू लागले. मागील वर्षी रोहिणी नक्षत्रात कापूस, तूर, उडीद पिकाची पेरण्या आटोपली होत्या.

मात्र यावर्षी मृग नक्षत्र संपण्याच्या मार्गावर आले असून, जून महिना संपत आला, तरी पाऊस झाला नव्हता. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला होता. परंतु, या पावसाने बळीराजा आनंदून गेला आहे. यावर्षी पावसा अभावी पेरणीस उशीर होत असल्याने पाऊस होतो की नाही या विवंचनेत शेतकरी होता.

परंतु असे असताना उशिरा का होईना, मेघराजाची कृपा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. या पहिल्याच पावसाने ओढे, नाले, तुडूंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांसह सर्व शेतकरी समाधान व्यक्त करताना दिसत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news