नगर : ‘क्रीडांगण’ची विभागीय चौकशी!

नगर : ‘क्रीडांगण’ची विभागीय चौकशी!
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : क्रीडांगण विकास योजनेतील मंजूर झालेल्या शाळांची कामे ही त्या-त्या शाळांनी किंवा जिल्हा परिषदेने करून घ्यायची आहेत. मात्र, तरीही अशाप्रकारे ही कामे झाली नसतील, तर याप्रकरणी चौकशी लावली जाईल, अशी माहिती पुणे विभागीय क्रीडा उपसंचालक प्रमोदिनी गड्डमवार यांनी दै. पुढारीशी बोलताना दिली.

गड्डमवार म्हणाल्या, क्रीडा विभागाच्या वतीने क्रीडांगण विकास योजनेतून शाळांच्या मैदान सपाटीकरणासाठी निधी दिला जातो. या निधीसाठी प्रस्ताव बोलावले जातात. शाळा स्तरावरून किंवा जिल्हा परिषदेतून हे ठराव क्रीडा विभागाकडे येतात. त्यानंतर पात्र शाळांना क्रीडांगणाची कामे करण्यासाठी मंजूरी दिली जाते.

मंजुरीनंतर संबंधित कामे हे त्या त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी व त्यांच्या समितीने करून घ्यायची असतात. त्यासाठीची टेंडर प्रक्रिया असेल, किंवा अन्य काही, त्याची जबाबदारी ही मुख्याध्यापकांची असते. क्रीडा विभागाचा काम देण्याशी कोणताही संबंध नसतो. केवळ काम कशा स्वरुपात करायचे, याचे मार्गदर्शन क्रीडा विभाग करतो.

नगर जिल्ह्यात क्रीडांगणाची कामे मुख्याध्यापकांनी दिली नसतील तर नेमकी कोणी दिली, याबाबत माहिती घेतली जाईल. क्रीडा विभागालाही याबाबत माहिती नसणे, हे देखील आश्चर्यकारक आहे. संबंधित अधिकार्‍यांशीही आपण बोलून याप्रकरणी माहिती घेणार असल्याचेही गड्डमवार यांनी सांगितले.

दरम्यान, क्रीडांगण विकास योजनेत अनियमितता निदर्शनास आल्याप्रकरणी औरंगबाद येथील क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांना दोन दिवसांपूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नगरच्या क्रीडांगण योजनेच्या चौकशीकडेही लक्ष असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news