नगर : ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांची घोषणा

नगर : ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कारांची घोषणा
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : गेल्या आठवड्यापासून वेध लागलेले आदर्श शिक्षक पुरस्कार काल रविवार दि. 4 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता मागील दोन आणि चालू एक, अशाप्रकारे तीन वर्षांच्या आदर्श शिक्षकांचा सन्मान सोहळा एकत्रित करण्यात येणार आहे. दरम्यान, पुरस्कारार्थींची निवड करण्यासाठी विलंब झाल्याने आज 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी हा सोहळा होणार नाही, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे लवकरच कार्यक्रमाची तारीख जाहीर केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे हा वितरण सोहळा होऊ शकला नाही. आता यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. प्रारंभी संबंधित प्रस्ताव पाठविलेल्या 43 शिक्षकांच्या शाळेवर भेटी देवून तेथील कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर झेडपीत सीईओंनी संबंधितांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेतली. प्रत्येक तालुक्यातून प्रस्ताव पाठविलेल्या तीन शिक्षकांमध्ये 125 पैकी सर्वात जास्त गुण मिळविलेल्या शिक्षकांची 'आदर्श शिक्षक' पुरस्कारासाठी विभागीय आयुक्तांनी निवड केली आहे.

आदर्श शिक्षकांचे सीईओ आशिष येरेकर, अतिरीक्त सीईओ संभाजी लांगोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी अभिनंदन केले आहे. दरम्यान, लवकरच या पुरस्कार वितरण सोहळ्याची तारीख जाहीर केली जाईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी पाटील यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक
संतोष लक्ष्मण सदगीर (अंबड शाळा , अकोले), अशोक विश्वनाथ शेटे ( खांडगाव शाळा, संगमनेर), सुदाम नारायण साळुंके ( गिरमेवस्ती शाळा, कोपरगाव), भिमराज पोपट शेळके ( पिंपरी लोकाई शाळा, राहाता), खान तन्नूम अब्बास ( बेलापूर उर्दू शाळा, श्रीरामपूर), विद्या बबन उदावंत ( दिघे वस्ती शाळा, राहुरी), सुमन भानुदास तिजोरे ( वडाळा बहिरोबा शाळा, नेवासा), शरद गंगाधर धलपे (काळा मळा शाळा, नगर), सविता सर्जेराव बुधवंत ( गुंफा शाळा, शेवगाव), आण्णासाहेब रामभाऊ साळुंके (जिरेवाडी शाळा, पाथर्डी), ज्योती दत्तात्रय साबळे ( पवार वाडी शाळा, पारनेर), भावना कैलास मोहिते ( मढेवडगाव शाळा, श्रीगोंदा), नवनाथ रामचंद्र दिवटे( माळवदे वस्ती शाळा, कर्जत), अनिता विठ्ठल पवार ( लटके वस्ती शाळा, जामखेड), यांचा समावेश आहे. तर आदर्श केंद्र प्रमुख म्हणून बाळासाहेब दळवी (चास, नगर) आणि भाऊसाहेब गायकवाड (वांबोरी, राहुरी) यांची नावे जाहीर झाली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news