नगर : अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण

नगर : अल्पवयीन मुलीचे राहत्या घरातून अपहरण
Published on
Updated on

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील रेल्वेस्टेशन येथून एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना दि. 17 जुलै रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईसोबत राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन परिसरात राहते. दि. 17 जुलै रोजी रात्री 10 वाजे दरम्यान ती मुलगी जेवण करुन, घरातील रोजची कामे झाल्यानंतर झोपी गेली होती, मात्र पहाटे 4 वाजेच्या दरम्यान ती घरातून बेपत्ता झाली.

सकाळी उठल्यावर मुलगी बेपत्ता झाल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. मुलीच्या नातेवाईकांनी तिचा परिसरात खूप शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी तिचे अपहरण केल्याची खात्री झाल्यानंतर तिच्या आईने राहुरी पोलिसांत धाव घेऊन फिर्याद दिली.

आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शहामद शेख हे करीत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news