नगर : अंशदान रकमेचा निर्णय पतसंस्थावर अन्यायकारक

नगर : अंशदान रकमेचा निर्णय पतसंस्थावर अन्यायकारक
Published on
Updated on

नगर, पुढारी वृत्तसेवा : सहकार खात्याचा अंशदान जमा करण्याचा हा एकतर्फी निर्णय पतसंस्थांवर अन्यायकारक आहे. अंशदान जमा करण्यास राज्य पतसंस्था फेडरेशनचा विरोध कायम आहे. सहकार आयुक्तांनी आपल्या आदेशाचा पुर्नविचार करावा, या मागणीचे निवेदन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिले.

सहकार खात्याने विभागीय सहकार निबंधक, जिल्हा उपनिबंधक ांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील बिगर कृषी सहकारी पतसंस्थांकडून 10 पैसे प्रति शेकडा याप्रमाणे गत 3 वर्षातील अंशदान जमा करण्याचा आदेश दिला आहे. सहकार आयुक्तांनी यापूर्वी अंशदानाबाबत राज्य पतसंस्था फेडरेशनला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, राज्यातील पतसस्थांना अंशदान जमा करण्याच्या सूचना सहकार आयुक्तांनी दिल्या आहेत.

पतसंस्थांच्या शिष्ठमंडळाने सहकार आयुक्त कवडे यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. यावेळी फेडरेशनचे खजिनदार दादाराव तुपकर, महासचिव डॉ.शांतीलाल सिंगी, उपाध्यक्ष सुदर्शन भालेराव, संचालक सुरेश पाटील, नाशिक विभागीय पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंत लोढा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे, आदी उपस्थित होते.

सहकार आयुक्त कवडे यांनी यावेळी राज्याचे नवीन सहकार मंत्री व पतसंस्था फेडरेशनशी र्चचा करूनच अंशदानाचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. सर्व पतसंस्थानी पुढील निर्णय होईपर्यंत अंशदानाची रक्कम भरू नये. पत्सास्थांना काही त्रास किंवा जबरदस्ती झाल्यास राज्य पतसंस्था फेडरेशनशी संपर्क साधावा. असे फेडरेशनचे अध्यक्ष कोयटे यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news