

राहुरी : पुढारी वृत्तसेवा
घरोघर जाऊन दूध घालणार्या तरुणाने दूध देत असताना एका 27 वर्षीय विवाहितेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना 3 जून रोजी राहुरी तालुक्यात घडली. सदर विवाहितेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दिनांक 3 जून रोजी यातील आरोपी किरण ऊर्फ रवींद्र अरूण ढोकणे (रा. उंबरे, ता. राहुरी) हा सदर महिलेच्या घरी दूध देण्यासाठी गेला होता.
विवाहित महिला तिच्या घरासमोर आरोपी ढोकणे याच्याकडून दूध घेत असताना त्याने गैरवर्तन केले. तिने सदरचा प्रकार तिचे सासू -सासर्यांना सांगितला. त्यांनी त्यांच्या दुसर्या मुलाला फोनवरुन झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्या विवाहित तरुणीचे सासू-सासरे व दीर यांनी आरोपीच्या घरी जाऊन जाबाबत विचारणा केली असता आरोपीने तरुणीच्या दिराला दगडाने मारहाण करून जखमी केले.
घटनेनंतर त्या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. तिच्या फिर्यादीवरून आरोपी किरण ऊर्फ रवींद्र अरूण ढोकणे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.