ट्रक चालकासह दोघांनी टेम्पो चालकास लुटले

ट्रक चालकासह दोघांनी टेम्पो चालकास लुटले

बोटा : पुढारी वृत्तसेवा:  मालवाहू टेम्पो चालकास ट्रक चालकाने साथीदारासह डोक्यावर लोखंडी रॉडने मारून लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली. दरम्यान, टेम्पो चालकाच्या खिशातील 12 हजार रूपये लुटल्याची घटना गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास पोखरी- बाळेश्वर फाटा येथे घडली.

गुंजाळवाडी पठार येथील टेम्पो चालक रवींद्र कारभारी आगलावे टेम्पो (क्र. एम.एच 04 एफ. डी 3532) नाशिक येथून घेवून संगमनेर मार्गे चाकणला निघाले होते. गुरुवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास पोखरी -बाळेश्वर फाटा येथे ते आले असता या दरम्यान रवींद्र आगलावे यांच्या टेम्पो समोर ट्रक (क्र. एम.एच. 17 बी. डी. 0111) वरील चालक पुण्याच्या दिशेने वाकडा तिकडा चालवत होता.

आगलावे यांनी या ट्रकला ओव्हरटेक करण्यासाठी टेम्पोचे अप्पर डिप्पर लाईट देत, टेम्पोचा हॉर्न वाजविला. हॉर्न का वाजविला, असे विचारत ट्रक चालक रवि दादा मराठे व सोबतचा भैय्या (पुर्ण नाव समजले नाही) या दोघांनी आगलावे यास शिवीगाळ करून रॉडने डोक्यात मारले. लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली.

आगलावे जखमी होताच त्यांच्या खिशातून 12 हजार रूपये लुटून हे दोघे पसार झाले. याप्रकरणी रवींद्र आगलावे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news