जेऊरला महावितरणच्या कर्मचार्‍याला शिवीगाळ

जेऊरला महावितरणच्या कर्मचार्‍याला शिवीगाळ

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : जेऊर बायजाबाई येथील महावितरण कंपनीच्या उपकेंद्रातील कर्मचार्‍याला दोघांनी शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्याम भास्कर भांड (रा. धनगरवाडी ता. नगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. नाथकृपा इंडस्ट्रिजचे मालक विजय संपत दारकुंडे व राजेंद्र पाराजी दारकुंडे (दोघे रा. जेऊर बायजाबाई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

राजेंद्र दारकुंडे हे भाजपचे तालुका उपाध्यक्ष आहेत. फिर्यादी भांड व त्यांचे सहकारी उपकेंद्रामध्ये ड्युटीवर असताना विजय व राजेंद्र दारकुंडे तेथे आले. ते फिर्यादीला म्हणाले,'तू मला न विचारता, मला फोन न करता, अचानकपणे लाईट बंद का केली. मला कोणतीही पूर्व कल्पना का दिली नाही', असे म्हणून शिवीगाळ केली. 'तू पुन्हा मला न फोन करता लाईट बंद केली तर तुमच्याकडे पाहून घेतो', अशी धमकी देऊन सरकारी कामात अडथळा निर्माण केला

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news