खंडाळा : पुढारी वृत्तसेवा : श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे बिबट्याला पकडण्यासाठी लावलेल्या सदोष पिंजर्यातील बोकडावर बिबट्याने यथेच्च ताव मारला. बिबट्या पिंजर्यात अडकला नाहीच, उलट शेतकर्याने पिंजर्यात ठेवलेला बोकड मात्र बिबट्या शिकार झाला. गावाच्या उत्तर दिशेला प्रवरा कालवा परिसरात शेखर ढोकचौळे, सचिन शेळके, रावसाहेब पिनाटे, विजय ढोकचौळे, महेश मरकडे, बाबासाहेब खांडेकर, बाळासाहेब ढोकचौळे यांच्या शेतजमिनी आहेत.
फळबागा व उसशेती जास्त असल्यामुळे बिबट्यांसाठी वास्तव्यास अनुकूल वातावरण आहे. शेतकर्यांना अनेकदा बिबट्यांचे दर्शन झाले. विजय ढोकचौळे यांच्या घराजवळ दोन दिशांना दोन बिबटे असा प्रसंग घडला. वनविभागाने येथे पिंजरा लावून त्यात बोकड ठेवला. मात्र, सदोष पिंजर्यामुळे बिबट्या न अडकता त्याने बोकड फस्त केला.