कोपरगाव :वृद्ध महिलेची अडीच तोळ्यांची पोत लांबविली

कोपरगाव :वृद्ध महिलेची अडीच तोळ्यांची पोत लांबविली
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील मळेगाव थडी येथील एका सत्तर वर्षीय वयोवृद्धेची अडीच तोळ्याची सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने चोरल्याची घटना घडली आहे. या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माळेगाव थडी येथील महिला विमलबाई आप्पासाहेब शिंदे (वय 70) या कोपरगाव- चास- हांडेवाडी या बस मधून प्रवास करत असताना अज्ञात चोरट्याने या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याची सोन्याची पोत चोरून नेल्याची घटना गुरुवारी (दि. 7) कोपरगाव ते टाकळी फाटा दरम्यान घडली आहे. याबाबत शहर पोलिस ठाण्यामध्ये महिलेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक ए. एम. दारकुंडे हे करीत आहे. दरम्यान बस स्थानक परिसरात पुन्हा चोर्‍यांचे सत्र सुरू झाले आहे. अनेक चोरटे महिला चोर यांचा मोठ्या प्रमाणावर येथे वावर आहे, छोट्या-मोठ्या चोरींच्या घटना दररोज होतात. मात्र त्याची पोलिस ठाण्यात दाद ना फिर्याद अशी परिस्थिती आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी बस स्थानक परिसरात सीसीटीव्ही बसवण्यात यावे म्हणून मागणी केली आहे. पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांसह प्रवाशांमधून होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news