के. के. रेंज हद्दीत चोरी, खारेकर्जुनेतील प्रकार

के. के. रेंज हद्दीत चोरी, खारेकर्जुनेतील प्रकार
Published on
Updated on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  खारेकर्जुने येथील लष्कराच्या के. के. रेंज हद्दीत अज्ञात चोरट्याने लष्करी मालकीच्या इलेक्ट्रिक केबलची चोरी केली. बुधवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी लष्करातील एअर फोर्स नायक महेंद्रसिंग समशेरसिंग यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि.10) सायंकाळी 6 ते गुरुवारी (दि.11) सकाळी 6 या कालावधीत के. के. रेंज हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश करून लष्करी मालकीच्या काळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक केबलची चोरी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भा.दं.वि.कलम 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news