श्रीगोंदा; पुढारी ऑनलाइन: श्रीगोंदयाचे तहसीलदार प्रदीप पवार यांची नंदुरबार येथे पुनर्वसन शाखेत बदली करण्यात आली आहे. प्रदीप पवार यांच्या जागी कोण येणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
तहसीलदार प्रदीप पवार मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये रुजू झाले हाेते. कोरोना काळात त्यांची नियुक्ती झाल्याने त्यांचा अधिक वेळ कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यावर गेला. मात्र, पालकमंत्र्यांच्या बैठकीत आरोप झाल्याने पवार चांगलेच चर्चेत आले होते.
श्रीगोंदा येथे त्यांची पहिलीच नियुक्ती हाेती. काही काळानंतर त्यांनी आपल्या कामाची पद्धत बदलत त्यांनी प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याबाबत असणार्या तक्रारी कमी झाल्या नाहीत.
कोरोना काळातही शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असणाऱ्या शेतरस्ता या प्रश्नावर त्यांनी लक्ष केंद्रित करत जवळपास ३५ रस्ते खुले केले.
प्रदीप पवार यांनी महसूल, वाळू तस्करीविरोधात अनेक कारवाया केल्या. वाळू तस्करी करणार्यांनी पवारांच्या बदलीसाठी हालचाली सुरू केल्या होत्या.
याच दरम्यान राजकीय द्वंद्वही तहसीलदार प्रदीप पवार यांच्या बदलीसाठी एक पोषक कारण असल्याचे बोलले जात आहे. काही राजकीय मंडळी पवार यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे नाराज होते. त्यांनीही पवार यांच्या बदलीसाठी प्रयत्न सुरू केले. यानंतर शुक्रवारी (दि. ६) रोजी रात्री उशिरा प्रदीप पवार यांची नंदुरबार येथील पुर्नवसन शाखेत बदली झाल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचलंत का?
पाहा व्हिडिओ : मुंबईजवळ वसलेल्या सोंडाई गडाची सफर