नगर महापालिकेचे कामकाज होणार ठप्प

नगर महापालिकेचे कामकाज होणार ठप्प

नगर; पुढारी वृत्तसेवा : सातवा वेतन आयोग व सफाई कर्मचार्‍यांसदर्भात लाड-पागे समितीची शिफारशी लागू करण्यासंदर्भात मनपा कर्मचारी युनियनचे नगर ते मुंबई पायी लाँग मार्च काढण्याचा इशारा दिला. त्यासंदर्भात आज महापालिकेत आमदार संग्राम जगताप, आयुक्त पंकज जावळे व युनियनच्या पदाधिकार्‍यांमध्ये चर्चा झाली. परंतु, युनियन लाँग मार्चवर ठाम असून, सरकात्मक निर्णय झाल्यानंतर योग्य निर्णय घेऊन असे युनियनने सांगितल्याचे समजते.

महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग व सफाई कर्मचार्‍यांना लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू कराव्या, यासह प्रलंबित मागण्यांसाठी 2 ऑक्टोबरपासून अहमदगनर ते मुंबई मंत्रालय असा पायी 16 दिवसांचा लाँग मार्च काढणार आहेत. हाल पायी मोर्चा कल्याण रस्त्याने जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या 733 कर्मचार्‍यांनी समूहिक रजेचे अर्ज मनपाकडे केले आहेत. यासंदर्भात आज महापालिका आयुक्तांच्या दलनात बैठक झाली. याप्रसंगी सरचिटणीस कॉ. आनंदराव वायकर, बाबासाहेब मुगदल आदी युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, या बैठकीत आमदार संग्राम जगताप यांनी कर्मचार्‍यांच्या मागण्या जाणून घेतल्या. त्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांशी संपर्क करून कर्मचार्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली. तसेच, तातडीने मंत्र्यालयात बैठक लावण्याचे आश्वासनही दिले. परंतु, कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करीत आहेत. आता लाँग मार्चचे नियोजन केले आहे. नगर येथून लाँग मार्च निघेल. मंत्रालयात आम्हाला बैठकीस बोलाविल्यास आम्ही नक्की येऊ. काही सकात्मक निर्णय झाल्यास लगेच लाँग मार्च थांबविला जाईल, असा सूर कर्मचार्‍यांनी आवळला.

लाँग मार्चमध्ये आजारी कर्मचारी, नव्याने रूजू झालेले कर्मचारी, वयस्कर कर्मचारी आमच्याबरोबर येणार नाहीत. त्यामुळे महापालिकेत कर्मचारी राहणार आहेत. आमचा लाँग मार्च सुरूच राहणार आहेत. ज्या ठिकाणी मंत्रालयातील बैठकीत सकात्मक निर्णय होईल. तिथे लगेच लाँग मार्च थांबविण्यात येईल.

– अनंत लोखंडे,
अध्यक्ष, मनपा कर्मचारी युनियन

सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठविला आहे. त्याचा पाठपुरवाही सुरू आहे. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचार्‍यांनी प्रतिनिधिक स्वरूपात आंदोलन करावे. लाँग मार्चमध्ये सफाई कर्मचार्‍यांना नेवू नये. सुमारे 733 कर्मचार्‍यांनी सामूहिक रजेसाठी अर्ज केला आहे. त्यावर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल.

– डॉ. पंकज जावळे,
आयुक्त, महापालिका

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news