नगर : कर्जत पोलिसांना शाबासकीची थाप

नगर : कर्जत पोलिसांना शाबासकीची थाप
Published on
Updated on

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास शिक्षा करत एक वर्षातच न्यायालयाच्या माध्यमातून पोलिसांनी पीडितेला न्याय मिळवून दिला. याबद्दल पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह कर्मचार्‍यांचा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला.  अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी श्रीगोंदा सत्र न्यायालयाने छबू उर्फ छबन पांडुरंग आखाडे (रा.चिंचोली काळदात) या आरोपीस नुकतीच मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्या.मुजीब शेख यांनी एक वर्षातच हा निकाल दिला.

धमकीच्या भितीपोटी मुलीने तक्रार केली नव्हती. पोलिस निरीक्षक यादव यांच्या आवाहनानंतर या मुलीने तक्रार केली होती. त्यानंतर तीला न्याय मिळाला. पोलिसांच्या या कामाची दखल घेत पोलिस अधीक्षक ओला यांनी पोलीस निरीक्षक यादव यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी आण्णासाहेब जाधव उपस्थित होते.
अपर अधीक्षक खैरे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात भेट देत उपनिरीक्षक अमरजीत मोरे, भगवान शिरसाठ, महादेव कोहक, शाम जाधव, गोवर्धन कदम, शाहूराज तिकटे, राणी व्यवहारे, सचिन वारे, ईश्वर माने, बळीराम काकडे, शकील बेग यांचा सन्मानपत्र देऊन गौरव केला. कर्जत पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

पो.नि. यादव यांच्यामुळे निर्भयास मिळाला आधार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची एक घटना घडली होती. धमकीच्या भीतीपोटी संबंधित मुलीने पोलिसांत तक्रार केली नव्हती. मात्र पोलिस निरीक्षक यादव यांनी एका कार्यक्रमात केलेल्या आवाहनानंतर तब्बल दोन महिन्यांनी या मुलीने तक्रार केली होती. त्यानंतर वर्षातच या निर्भयाला न्याय मिळाला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news