नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदारनोंदणी कार्यक्रम जाहीर

नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदारनोंदणी कार्यक्रम जाहीर
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : भारत निवडणूक आयोगाच्या वतीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी मतदार याद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांमध्ये राजकीय व्यूहरचनेला वेग येणार असून, 30 डिसेंबर 2023 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, तसेच नाशिक विभाग शिक्षक आणि व मुंबई शिक्षक मतदारसंघातील विद्यमान सदस्यांचा कालावधी 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने या चार मतदारसंघांच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदारयाद्यांचा पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघाची अंतिम मतदारयादी 30 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. यासाठी कार्यक्रमाचे विविध टप्पे हाती घेतले आहेत. मतदार नोंदणीसाठी 30 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. 16 ऑक्टोबर 2023 रोजी मतदार नोंदणीसाठी वर्तमानपत्रातील नोटिसीची प्रथम पुनःप्रसिद्धी होणार आहे. 25 ऑक्टोबरला नोटिसांची द्वितीय पुर्नप्रसिद्धी दिली जाणार आहे. नमुना 18 व 19 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 6 नोव्हेंबर 2023 आहे.

20 नोव्हेंबरपर्यंत हस्तलिखित तयार करणे व प्रारूप मतदारयाद्यांची छपाई केली जाणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदारयाद्यांची प्रसिद्ध होणार आहेत. या प्रसिद्धीवर 9 डिसेंबर 2023 पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. उपलब्ध दावे आणि हरकती निकाली काढून 25 डिसेंबरपर्यंत पुरवणी यादी तयार केली जाणार असून, 30 डिसेंबर 2023 रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.

जिल्ह्यात होते 13 हजार 439 मतदार

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या 2018 च्या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील किशोर भिकाजी दराडे निवडून आले होते. त्यांच्या आमदारकीचा सहा वर्षांचा कालावधी 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. गेल्या निवडणुकीसाठी जिल्ह्यात एकूण 13 हजार 439 शिक्षक मतदार होते. त्यापैकी 12 हजार 383 शिक्षकांनी मतदानाचा अधिकार बजावला होता.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news