अमरनाथला अडकलेल्या यात्रेकरुंना विखेंची मदत

अमरनाथला अडकलेल्या यात्रेकरुंना विखेंची मदत

लोणी : पुढारी वृत्तसेवा :  अमरनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांना संकटकाळात मदत व्हावी, यासाठी पालक मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी थेट जम्मु- काश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून सहकार्य उपलब्ध करुन दिल्याने अडकलेल्या भाविकांचा परतीचा मार्ग सुकर झाला आहे. अमरनाथ व वैष्णोदेवी यात्रेला श्रीरामपूर, कोल्हार, लोणी येथील भाविक गेले, मात्र जम्मु आणि काश्मिरमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्ठीसह पाऊसामुळे श्रीनगर ते जम्मु दरम्यान रस्ते खचल्याने भाविक अडकून पडले. या भाविकांना लष्कराने सहकार्य केले. त्या बिकट परिस्थितीत उपलब्ध ठिकाणी मुक्काम करावा लागला. या भाविकांपैकी अनेकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्याशी थेट संपर्क साधला.

तेव्हा मंत्री विखे पा. आश्वी येथे महाजनसंपर्क अभियानाचा कार्यक्रमात होते. या परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवून मंत्री विखे पा. यांनी जम्मु- काश्मिरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशी संपर्क साधून भाविकांना सर्वतोपरी मदत करण्याची विनंती केली. राज्यपाल महोदयांन महाराष्ट्रातील सर्व भाविकांना मदत करण्याची ग्वाही देत नगर जिल्ह्यातील भाविकांनाही मदत करण्याचे आश्वासित केले. काही वेळेत या भाविकांपर्यंत यंत्रणा पोहोचल्याचे सांगत त्यांनी मदतीबद्दल मंत्री विखे पा. यांनी राज्यपालांचे आभार मानले. हे सर्व यात्रेकरु भाविक सुखरुप परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. पालक मंत्री विखे पा. प्रवासी भाविकांच्या सतत संपर्कात आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news