अकोले : रस्त्यावर भरणारा भाजीपाला बाजार नगरपालिकेने केला स्थलांतरीत

अकोले : रस्त्यावर भरणारा भाजीपाला बाजार नगरपालिकेने केला स्थलांतरीत

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन महिण्यापासून शहरातील बाजारतळाचे काम सुरु असल्याने तहसील कचेरी ते पंचायत समिती रस्त्यावर भाजीपाला बाजार भरत असल्याने खरेदी करणार्‍या बरोबर वाहन धारक, विद्यार्थी, नागरिकांना गर्दीतून मार्ग काढावा लागत होता. या पार्श्वभूमीवर अकोलेत दोनदा आठवडे बाजार भरत होता. या बाबत रस्त्यावर, पथार्‍या लावल्याने अपघातांना मिळतेय निमंत्रण असे वृत्त दैनिक पुढारी मध्ये प्रसिद्ध होताच अकोले नगरपंचायतीने रस्त्यावरील भाजीपाला बाजार स्थंलातरीत केला.
अकोले शहरात बाजार तळाचे नूतनीकरणाचे काम काही महिन्यापासून सुरू आहे, परंतु आठवडे बाजारची पर्यायी व्यवस्था म्हणून अगस्ती विद्यालयाच्या पंटागणांत व्यवस्था करर्ण्ीयात आली आहे.

शेतकरी व भाजीपाला व्यावसायिकानी कोल्हार घोटी राज्य मार्गावरील ग्रामीण रुग्णालयाच्या सभोवतालीच रस्त्यावर दुकाने लावत. यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प होऊ लागल्याने नगरपंचायतीने पोलिस गांऊडवर दुकाने लावण्यास सांगितले. परंतु तहसील कचेरी ते पंचायत समितीच्या रस्त्यावर दररोज दुपारनंतर शेतकरी व व्यावसायिक रस्त्यावर भाजीपाल्याचे दुकाने लावत होती. या परिसरात न्यायालय, शिक्षण, महिला बालकल्याण, वनविभाग, पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय, भुमिअभिलेख, आरोग्य आदि विभागाचे सरकारी कार्यालये व विद्यालय असल्याने तालुक्यातील नागरिक, विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असे. दर दिवस तहसील कचेरी ते पंचायत समिती या रस्त्यावर भाजीपाला विक्री करण्यासाठी शेतकरी व व्यावसायिक बसत. विक्री दरम्यान अपघाताचा धोका संभवत होता.

त्यामध्ये सुसूत्रता आणि उपाययोजना नगरपंचायतकडुन होताना दिसत नव्हते. मात्र शेतकरी आणि व्यवसायिकाकडुन बाजार कर( पावती) घेतली जात असल्याने आठवडे बाजारकरांना छुपा पाठिंबा नगरमंचायतीने दिला होता. शहरात तहसील कचेरी ते पंचायत समिती या रस्त्यावर बसणार्‍या भाजीपाला व्यवसायिक व शेतकर्‍यांना दुकानासाठी पर्यायी जागा उपलब्ध करून रस्ता मोकळा करण्याची मागणी जनसामान्यातून होत असल्याने दैनिक पुढारी ने अकोलेत भरतो दोनदा आठवड्यात बाजार, रस्त्यावर, पथार्‍या लावल्याने अपघातांना मिळतेय निमंत्रण असे वृत्त प्रसिद्ध केले. वृत्त प्रसिद्ध करताच अकोले नगरपंचायतीला उशिराना का होईना जागी आली. रस्त्यावर भरणारा बाजार, बाजार तळ्याच्या आवारात स्थंलातरीत करण्यात आला.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news