बेळगाव - चिखले जवळ ट्रकला अपघात, जांबोटी-चोर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प

खानापूर : पुढारी वृत्तसेवा- बेळगाव-गोवा व्हाया चोर्ला महामार्गावरील चिखलें जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातामुळे जांबोटी-चोर्ला मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. अपघातग्रस्त दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे झाल्याने क्रेनच्या सहाय्याने ते बाजूला करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत. गेल्या पाच तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याने दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.