वसंत लोढा सातारा पोलिसांच्या ताब्यात

वसंत लोढा सातारा पोलिसांच्या ताब्यात

लोणंद/अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कापशी (ता. फलटण) येथील शरयू साखर कारखान्याची 1 कोटी 14 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी अहमदनगर येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांना लोणंद पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे; तर फलटण आणि कराडमधून दोन संशयितांना अटक केली आहे. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.

संतोष पोपटराव होले व महादेव अनंत भंडारे, अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शरयू साखर कारखान्याची 1 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद संचालक अविनाश शिवाजी भापकर यांनी लोणंद पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार वसंत लोढासह एक ठेकेदार व कारखान्याच्या तीन अभियंत्यांवर गुन्हा दाखल आहे. कारखान्यातील इंजिनिअरिंगच्या विविध कामांचा करार 2021 मध्ये फॅब्रिक्स इंडस्ट्रीजतर्फे वसंत लोढा व अ‍ॅक्युरेट इंजिनिअरींग अँड इरेक्शन यांच्यातर्फे सांगली येथील प्रसाद अण्णा यांच्यासोबत करण्यात आला होता.

करारावेळी कोटेशनबरोबर संशयितांनी कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र जोडले होते. या आधारावरच त्यांना वर्क ऑर्डर देऊन मोठी रक्कम दिली. मात्र, संशयितांनी ऑर्डरप्रमाणे काम केले नाही व कामास टाळाटाळ केली. त्यामुळे कागदपत्रे तपासली असता ती बनावट असल्याचे आढळले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news