

जामखेड : पुढारी वृतसेवा : नगरपरिषदेच्या ठेकेदाराकडून कचर्याची वाहतूक उघड्या वाहनातून केली जात आहे. डेपोपर्यंत जाताना कचरा मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पडत आहे. तसेच तो जाणार्या-योणार्यांच्या अंगावर उडत असून, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचरा वाहतूक करताना कोणतीही काळजी घेतली जात नाही. कचरा नागरिकांच्या अंगावर पडत असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. तो कचरा पाठीमागे वाहन चालवत असलेल्या वाहकाच्या डोळ्यातही जात आहे. तसेच दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत आहेत.
कचरा वाहतूक करणार्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. या वाहनांवरील कर्मचारीदेखील गाडीत कचरा टाकण्यासाठी महिला-मुलींनी मदत करत नाही. त्यामुळे कचरा गाडीत टाकताना अनेकदा उंचीअभावी महिला, मुली अथवा मुलांच्या अंगावर पडतो. तो कर्मचार्यानीच घेऊन घंटागाडीत टाकावा अशी मागणी नागरिक करत आहेत.
विद्यार्थ्यांचेही आरोग्य धोक्यात
जामखेड शहरातील कचरा डेपो हा जामखेड करमाळा रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)जवळ असल्याने त्याच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
हेही वाचा :