Pizza Garden : पिझ्झा गार्डन! काय आहे हा प्रकार?

Pizza Garden : पिझ्झा गार्डन! काय आहे हा प्रकार?
Published on
Updated on

ज्या लोकांना आपल्या हाताने बनवलेला पिझ्झा खाणे पसंद आहे आणि त्यामध्ये नवनवे प्रयोगही करण्याची सवय आहे, अशांसाठी पिझ्झा गार्डन हा एक अतिशय वेगळा असा पर्याय आहे. आतापर्यंत आपण किचन गार्डन, टेरेस गार्डन, हँगिंग गार्डन ही नावं ऐकली आहेत; पण पिझ्झा गार्डन हा काय प्रकार आहे? हे बहुतेकांना माहीत नसावे. पिझ्झा गार्डन ही परदेशातून आलेली गार्डनिंगची अतिशय रोचक अशी कला आहे आणि ही कला वेगाने देशात पसरत आहे. पिझ्झा गार्डन या संकल्पनेच्या अंतर्गत एका मोठ्या वृत्ताकार जमिनीवर हा बगिचा बनवला जातो. या वर्तुळाचे त्रिकोणी भाग विभागलेले असतात. या प्रत्येक भागामध्ये पिझ्झामध्ये वापरण्यात येणार्‍या वेगवेगळ्या भाज्या आणि मसाले उगवले जातात. म्हणूनच या गार्डनिंगचे नाव पिझ्झा गार्डन असे पडले आहे. या प्रकारच्या गार्डनची देखभाल कुटुंबातील मुलांना गार्डनिंगबद्दल जागरूक करण्यासाठी केली जाते. (Pizza Garden)

पिझ्झा गार्डन हे छोट्या जागेवरदेखील बनवले जाते. यामध्ये पिझ्झासाठी लागणारी सर्व सामग्री म्हणजे टोमॅटो, कांदा, लसूण, तुळशी, सिमला मिरची आणि ओवा उगवले जाते. भारतामध्ये ही संकल्पना बंगळूर, पुणे आणि दक्षिण मध्य भारतातील अनेक शहरांमध्ये जास्त प्रसिद्ध होत आहे. परदेशातून आलेल्या आणि वेगवेगळ्या स्वादाचे भोजन घेण्याची आवड असणार्‍या भारतीयांनी यावर लक्ष केंद्रित केल्याचे दिसते. हे गार्डन बनवणे बरेच सोपे आहे. त्यासाठी जास्त मातीची गरजही नसते. कारण, सर्व झाडे एकाचवेळी एका मोठ्या, गोलाकार पसरट पॉटमध्येदेखील उगवता येतात. त्यामुळे ही झाडे टेरेस किंवा किचन गार्डनचा भागही बनू शकतात. या गार्डनला भारतीय रूप देण्यासाठी यामध्ये मिरची आणि हळदही उगवता येऊ शकते. अशाप्रकारे ही झाडे घरातल्या कुंडीतही उगवून आपण मुलांमध्ये झाडांबद्दल प्रेम आणि आस्था निर्माण करू शकतो. (Pizza Garden)

या गार्डनसाठी खत म्हणून किचनमधील टाकाऊ पदार्थ म्हणजे चहाची पावडर, भाज्या, फळांचा गर अथवा अंड्याची सालं वापरू शकतो. या गार्डनचे निरीक्षण आणि देखभाल करणे मुलांनाही खूप आवडते. आपल्या गरजेनुसार यातील भाज्यांमध्ये बदल करावा. आलं, पुदिना, पालक आणि कोबी या भाज्यांचाही यामध्ये समावेश करता येतो. मुलांनाही घरी अशा भाज्यांचे बी अथवा रोप आणून त्याचे रोपण करणे खूप आवडते. आपल्या घरात उगवलेली भाजी ते आवडीने खातात. म्हणूनच या पावसाळ्यात गार्डनिंग करण्यासाठी आणि लहान मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी पिझ्झा गार्डन हा एक चांगला पर्याय आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news