नगर: पोलिस कर्मचार्‍यांच्या आज होणार बदल्या

नगर: पोलिस कर्मचार्‍यांच्या आज होणार बदल्या

नगर, पुढारी वृत्तसेवा: जिल्हा पोलिस दलातील पोलिस अंमलदार व चालक यांच्या सर्वसाधारण प्रशासकीय बदल्या आज होणार आहेत. खंडीत व अखंडीत कालावधी गृहीत धरून एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्या 915 पोलिस अंमलदार व 60 चालक अशा 975 कर्मचार्‍यांच्या बदल्या होणार आहेत.

कर्मचार्‍यांना सकाळी आठ वाजेपासून येथील पोलिस मुख्यालयाच्या रिक्रेशन हॉलमध्ये उपस्थित राहावे लागणार आहे. सकाळी 8 ते 10 यावेळेत 13 उपनिरीक्षकांसह 64 सहायक फौजदारांना बोलविण्यात आले आहे. सकाळी 10 ते 12 यावेळेत 164 पोलीस हवालदार, दुपारी 12 ते 2 यावेळेत 241 पोलीस नाईक यांना बोलविण्यात आले आहे.

दुपारी तीन ते सहा यावेळेत 433 पोलिस शिपाई यांना बोलविले आहे. सायंकाळी सहा ते सात यावेळेत 60 चालक यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पारदर्शक पध्दतीने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news