file photo
file photo

नगर : जनावरांची वाहतूक करणारे तीन टेम्पो जप्त

Published on

नगर; पुढारी वृत्तसेवा : घोडेगावहून जनावरांना घेऊन जाणार्‍या टेम्पोला हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून एमआयडीसी पोलिस ठाण्यात हजर केले. पोलिसांनी म्हशी व तीन वाहने असा नऊ लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
किरण परसराम गुंड (रा. पिंपळगाव माळवी) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

हमीद फकीर इनामदार (रा. भोईआळी, ता. जुन्नर जि.पुणे) जावेद नबाब इनामदार (रा.जुन्नर) इरफान रफिक पठाण (रा. जेऊर बायजाबाई, ता.नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. कत्तलीसाठी जनावरांना घेऊन घोडेगावातून (ता. नेवासा) वाहने येत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती.

त्यानुसार काही जणांनी पिंपळगाव माळवी शिवारात थांबून तीन टेम्पो अडवले व पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तीन लाख 43 हजार रूपये किमतीच्या म्हशी, वगारू आणि सहा लाख रूपये किमतीचे तीन टेम्पो असा नऊ लाख 43 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संदीप आव्हाड करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news