उदयनराजेंकडे महाराजांचे वंशज असल्याचे दाखले मागणाऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये : राधाकृष्ण विखे-पाटील

राधाकृष्ण विखे
राधाकृष्ण विखे

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे दाखले उदयनराजे भोसले यांच्याकडे मागणाऱ्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, असा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी खा.संजय राऊत यांना दिला. संगमनेर येथे माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी हिंदुत्वाचा राजकारणासाठी सोयीस्कर वापर आणि शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून आपले इंगित साध्य करणारे आता महाराष्ट्र पेटवू पाहात असल्याचा आरोप केला.

शिवाजी महाराजांच्या संदर्भात राज्यापालांनी केलेल्या वक्तव्याचे समर्थन होवूच शकत नाही. युगपुरुष शिवाजी महाराज सर्वच पिढ्यांचे आदर्श आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील वक्तव्य निश्चितच वेदनादायी असल्याचे विखे यांनी स्पष्ट केले. तसेच उदयनराजे भोसले यांच्या ज्या भावना आहेत, त्याच सर्व महाराष्ट्राच्या भावना असल्याचे विखे-पाटील म्हणाले.

राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा हिंदुत्वाला तिलांजली देणारेच राज्यात देवभक्ती आणि देशभक्ती दाखविणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करीत असल्याचा दावा पाटील यांनी केला. मंत्री विखे-पाटील म्हणाले की, याच सरकारच्या काळात औरंगजेबाच्या समाधीवर फुले वाहिली गेली. तेव्हा तुमची मनगटे कुठे बांधली गेली होती? तुमचा मर्दपणा तेव्हा कुठे गेला होता? असा सवालही विखे-पाटील यांनी उपस्थित केला.

हेही वाचंलत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news