पाथर्डीत झेडपीच्या शाळेत चोरी ; गुन्हा दाखल

पाथर्डीत झेडपीच्या शाळेत चोरी ;  गुन्हा दाखल
Published on
Updated on

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दरवाजाचे कुलूप तोडून शाळेतील एल.इ.डी टिव्ही व संगणक असा वीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रेपाळ यांनी पाथर्डी पोलिसात दिली आहे.

मुख्याध्यापक कृष्णा रेपाळ व सहकारी शिक्षिका मालन बळीराम करे या मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शाळेवर गेल्या होत्या. यावेळी शाळेच्या दरवाज्याचा कडी कोंडा व कुलूप तुटलेले दिसले. आत मध्ये जाऊन त्यांनी पाहिले असता मुलांना शिकण्यासाठी ग्रामपंचायतीने दिलेला एल.इ.डी टिव्ही व संगणक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. शाळेचे मुख्याध्यापक कृष्णा रेपाळ यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news